परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात ,गुंतवणुकीचा वेग कायम ठेवल्याने या महिन्यात आत्तापर्यंत रोखे आणि कर्जामध्ये 44344 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातल्या डिपॉझिटरीजनी दिलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी 30 हजार 771 कोटी रुपये रोखे आणि 13573 कोटी रुपये कर्जात गुंतवले आहेत.
वाहन उद्योग, भांडवली वस्तू, आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार तसेच तेल वायू क्षेत्रामध्ये या खरेदीदारांनी गुंतवणूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात रोखे आणि कर्ज या दोन्हींमध्ये दोन लाख 82 हजार 338 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक होती. सकारात्मकता आणि सुधारणावादी स्थिर सरकारचा भरवसा ही भांडवली बाजारात तेजी येण्याची कारणं आहेत.