पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पाउलो रांगेल आज त्यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. उद्या नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत पाउलो रांगेल यांची बैठक होणार आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांचे बहुआयामी संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | December 12, 2024 2:35 PM | पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री | भारत दौरा
पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर
