परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरापेट्रिटिस यांनी काल नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी जयशंकर यांनी भारत-ग्रीस भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. भारताला व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरापेट्रिटिस यांनी ग्रीस पर्यटन, संस्कृती आणि व्यापारासह सर्व बाबतीत भारताबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवू इच्छित असल्याचं स्पष्ट केलं. ग्रीस भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | February 7, 2025 9:57 AM | ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री | डॉ. एस जयशंकर | द्विपक्षीय बैठक | परराष्ट्र व्यवहारमंत्री
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्यात द्विपक्षीय बैठक
