डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मिफ महोत्सवातले चित्रपट पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार

मिफ महोत्सवातले चित्रपट यंदा पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार आहे. यंदाच्या मिफमध्ये ५९ हून देशातल्या ६१ भाषांमधले १ हजारांहून अधिक चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. पहिल्यांदाच या महोत्सवासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं प्रवेशिका आल्या आहेत. त्यातल्या ३१४ चित्रपटांचा समावेश चित्रपट महोत्सवात झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत २५ आणि राष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत ७७ चित्रपट आहेत. अमृत काळातला भारत या विषयावरच्या चित्रपटांसाठी यंदाच्या महोत्सवात विशेष स्पर्धा आयोजित केली आहे. कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळालेला लघुपट ‘Sunflowers were the first ones to know’ मिफमध्ये दाखवला जाईल. या व्यतिरीक्त पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयानं पुनरुज्जीवन केलेल्या काही चित्रपटांचं प्रदर्शन हे यंदाच्या महोत्सवाचं विशेष आकर्षण आहे. चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांच्या व्यतिरीक्त देशविदेशातल्या तज्ञांचे मास्टरक्लास, चर्चासत्र हे ही यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं वैशिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा