डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी परिवर्तनीय अनुभवासह नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी, असं आवाहन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं जागतिक बँकेच्या वार्षिक सभेत “भविष्यकालीन जागतिक बँक समूह” विकास समितीला संबोधित करताना बोलत होत्या. व्यापक सहभागाला चालना देण्यासाठी, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अधिक कर्ज घेण्यास प्रोत्साहन देत तसंच विकासाचा जोर वाढवत स्पर्धात्मक दरांच्या किंमत प्रारूपांसह परवडण्याजोग्या दरात जागतिक बँकेची सेवा आवश्यक असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.
Site Admin | October 26, 2024 5:46 PM | अर्थमंत्री निर्मला सीतारामन