हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पुराचा धोका कायम आहे. भारतीय हवामान विभागानं येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेशातल्या चंबा, कांगडा, शिमला आणि सिरमौर या चार जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातल्या लाहौल-स्पिती आणि किन्नौर वगळता उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाच्या ७४ घटना घडल्या आहेत. यात ३१ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण बेपत्ता आहेत. तसंच १४९ पशुधनही मृत्यूमुखी पडले आहेत. तसंच ८३ घरे, १७ दुकाने आणि २३ गोठ्यांचे नुकसान झालं आहे.