डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 5, 2024 8:22 PM

printer

राज्याच्या विविध भागात पूरसदृश स्थिती/ मुख्यमंत्र्यांनी केली पुण्यातील पुरग्स्त भागाची पाहणी

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं दिलासा दिल्यानं जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळं पुणे शहरात निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या भागांमध्ये कालपासून प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीसाठी आवश्यक बचाव उपकरणांसह लष्करी मदत तैनात करण्यात आली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

 

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या १५ मच्छिमारांची सुटका नौदलानं आज केली आहे. मच्छिमार रविवारी मुठा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले असताना गंगापुर धरणातून पाणी सोडल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सध्या गंगापूर धरणातून ८ हजार १००, दारणा धरणातून २२ हजार ३८३ तर नांदूरमध्यमेश्वर इथून ५४ हजार २३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. महानगरपालिकेनं आतापर्यंत योग्य त्या उपाययोजना केल्या असून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा