कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुकसान नुकसान झाल्याची माहितीजिल्हा प्रशासनानं दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक या पूर्वीच दाखल झाले असून आणखी एक पथक आज दाखल होणार आहे. आगामी १० दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस राहणार असून, या कालावधीत विशेषतः घाटमाथ्यावरील तालुक्यात ४५० मिलीमीटर पाऊस होईल. त्यातही पहिल्या ५ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.