केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज फिट इंडिया मोहिमेंतर्गत गुजरातमधे पोरबंदर इथं आयोजित संडेज ऑन सायकल या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी पोरबंदर मधल्या उपलेटा परिसरात स्थानिकांसमवेत सायकलवरुन रपेट केली.
संडेज ऑन सायकल हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या सहयोगानं सुरु केलेला उपक्रम असून तो नागरिकांना तंदुरुस्ती तसंच जोम वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशानं गेल्या महिन्यापासून सुरु करण्यात आलेला उपक्रम आहे.