मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दुग्ध व्यवसाय विकास विभाग इमारतीतल्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Site Admin | December 22, 2024 3:42 PM | Fishermen | Kisan Credit Card