वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकात्यातल्या राधागोविंद कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
Site Admin | August 27, 2024 1:28 PM | National Task Force | Supreme Court