दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवार देणार असल्याची माहितीही श्रीवास्तव यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत आपने ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाने मात्र अद्याप एकही यादी जाहीर केलेली नाही.
Site Admin | December 29, 2024 1:59 PM | Man Ki Baat