हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पहिली उमेदवारी जाहीर करताच पक्षात बंडखोरीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राजेश जून यांनी, उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष निवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे नेते रामकृष्ण फौजी यांनी तिकिट न मिळण्याच्या शक्यतेमुळे आज कार्यकर्त्यांची पंचायत आयोजित केली होती. आपल्याला उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी उद्या कार्यकर्त्यांसह दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Site Admin | September 7, 2024 8:14 PM | Congress | Haryana Assembly elections