पंढरपूर इथं सर्व सुविधायुक्त राज्यातलं पहिलं १ हजार खाटांचं सामान्य रूग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
नवनिर्मित १ हजार खाटांच्या या रूग्णालयात सामान्य रूग्णालय ३०० खाटा, महिला व शिशु रूग्णालय ३०० खाटा, ऑर्थोपेडिक आणि ट्रामा केअर रूग्णालय १५० खाटा, सर्जरी रूग्णालय १०० खाटा, मेडिसीन अतिदक्षता रूग्णालय १०० खाटा, आणि मनोरूग्णालय ५० खाटा अशी रचना असणार आहे. यासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम आणि पदनिर्मितीची स्वतंत्रपणे कार्यवाही केली जाईल, असे निर्णयात नमूद केलं आहे.