केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मेक्सिकोचा दौरा संपवून अमेरिकेत पोहचल्या. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि न्यूयॉर्कमधले भारताचे महावाणिज्यदूत बिनय श्रीकांत प्रधान यांनी त्यांचं काल संध्याकाळी नेवार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं.
अर्थमंत्री १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिकोच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी ग्वाडालजारा आणि मेक्सिको सिटी मधल्या विविध क्षेत्रातल्या नेत्यांशी संवाद साधला. निर्मला सीतारामन २६ ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान त्या जी-२० चे अर्थमंत्री, सेंट्रल बँकेचे गव्हर्नर, पर्यावरण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या संयुक्त बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.