करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा अधिक सोपी आणि सरळ बनवण्याचं तसंच नोटीस पाठवण्याच्या कारणाचं स्पष्टीकरण देखील देण्यात यावं, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागाला केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत प्राप्तीकराच्या १६५ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. ७२ टक्के करदात्यांनी जुन्या कर प्रणालीऐवजी नवीन कर प्रणालीचा स्वीकार केला असून करप्रणाली चेहराविरहित असल्यानं करदात्यांचा विश्वास संपादन केला आहे, असंही निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या.
Site Admin | August 22, 2024 1:05 PM | Income Tax Department | Nirmala Sitharaman