केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून सहा दिवस इंग्लंड आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी त्या काल रात्री लंडन इथं पोहोचल्या. भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांनी त्यांचं हिथ्रो विमानतळावर स्वागत केलं.
आज त्या भारतीय उच्चायुक्तालयानं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या वार्तालाप सत्रात सहभागी होऊन या दौऱ्याचा प्रारंभ करतील. त्यानंतर उद्या त्या त्यांच्या ब्रिटिश समपदस्थ चॅन्सेलर रॅचेल रीव्ह यांच्यामवेत भारत-युके आर्थिक -वित्तीय संवादाच्या १३ व्या मंत्रीस्तरीय फेरीत सहभागी होतील.