आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्र्वभूमीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यात येत आहे. त्याअंतर्गत काल नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहाव्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांबाबत चर्चा करण्यात आली. वित्त तसंच आर्थिक व्यवहारविषयक विभागाचे सचिव,केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार तसंच आरोग्य आणि शिक्षण विभागांचे सचिवही या बैठकीला उपस्थित होते. तत्पूर्वी काल अगोदर त्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींबरोबर सल्लामसलत केली.
Site Admin | December 31, 2024 1:05 PM | FM Nirmala Sitharaman