वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. यातून किर्तनकार, वारकरी, भजनीमंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसंच पालखी मार्गांचं व्यवस्थापन केलं जाईल, असं ते म्हणाले. पंढरपूर वारीला जागतिक नामांकनासाठी मिळावं यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. याशिवाय कोकणातली कातळशिल्पे, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवाचाही प्रस्ताव पाठवला जाईल. यावर्षीपासून वारीतल्या मुख्य पालख्यांतल्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य सरकार देणार आहे. तसंच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष देहू-आळंदी ते पंढरपूर मार्गावर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत वैद्यकीय उपचार देणार आहे.
Site Admin | June 28, 2024 5:14 PM | budget | Maharashtra Assembly | Monsoon Session 2024 | Warkari