भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडियम इथं काल रात्री झालेल्या हॉकी एफआयएच प्रो लीगमधल्या सामन्यांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. पुरुष संघानं आयर्लंडचा ४-० नं पराभव केला. तर महिला संघानं आधीच्या सामन्यातल्या पराभवाची परतफेड करत जर्मनीवर १-० नं विजय मिळवला.
भारताच्या पुरुष हॉकी संघाचा सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता इंग्लंडविरुद्ध होईल. तर महिला संघाचा सामना नेदरलँडविरुद्ध उद्या संध्याकाळी सव्वा पाच वाजता होईल.