एफ आय एच हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर भुवनेश्वर मधल्या कलिंगा हॉकी मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी सव्वापाच वाजता सुरू होणार आहे.
या स्पर्धेत सलीमा टेटेच्या नेतृत्वातील भारतीय संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.भारतीय पुरुष संघाचा सामना याच मैदानावर आयर्लंडशी होणार आहे.हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ ४ सामन्यांतून ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.