फुटबॉलमधे ब्राझिलचा व्हिनिशियस ज्युनियर हा फिफाच्या यंदाच्या सर्वाेत्कृष्ट पुरूष फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. अर्जेटिनाचा लिओनेल मेसीनं हा पुरस्कार आधीच्या दोन वर्षांसाठी जिंकला होता. स्पेनची ऐताना बोन्मती हिनं सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे. कतारची राजधानी दोहा इथं पुरस्कार वितरण समारंभ झाला.