फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा गेल्या वेळचा विजेता डिंग लिरेन यांच्यात चौदावा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला जागतिक विजेत्याचा मान मिळणार आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यास उद्या स्पीडचेस प्रकारातून विजेता निवडला जाईल. काल गुकेश आणि लिरेन यांच्यात तेरावा सामना पाच तासांच्या लढतीनंतरही अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडूंना सध्या प्रत्येकी साडेसहा गुण मिळाले आहेत.
Site Admin | December 12, 2024 10:15 AM | Ding Liren | Dommaraju Gukesh | FIDE World Chess Championship