बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू हिनं २०२४ महिला जागतिक ब्लित्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. विजयी घोडदौड कायम ठेवत साडेनऊ गुणांसह ती गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. गतविजेती व्हॅलेंटिना गुनिना, पॉलीना शुव्हालोव्हा यांच्यासह अनेक दिग्गज बुद्धिबळपटूंचा तिनं पराभव केला. कोनेरू हंपीचं पुढच्या फेरीतलं स्थान थोडक्यात हुकल्यानं या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जाणारी वैशाली ही भारताची एकमेव बुद्धिबळपटू आहे.
Site Admin | December 31, 2024 8:23 PM | FIDE World Blitz Championship 2024