डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाला फिक्कीचा ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापिठाला फिक्कीच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या राष्ट्रीय पुरस्कारानं तर महात्मा फुले कृषि विद्यापीठाला फिक्कीच्या सर्वोकृष्ट विद्यापीठ या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. दिल्लीत आज झालेल्या १९ व्या ‘फिक्की हायर एज्युकेशन समिट २०२४’ या कार्यक्रमात भारतातल्या ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त लिंडा कॅमरून यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठानं शिक्षण, संशोधनामध्ये केलेले अभुतपूर्व कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातले हे एकमेव विद्यापीठ आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा