डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक

गेल्या दहा वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागाने डिसेंबर २०२४ पर्यंतचा परकीय गुंतवणुकीसंदर्भातल्या अहवालात ही माहिती दिली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातल्या पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षात महाराष्ट्रात एका वर्षात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीसह महायुती सरकारनं आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात आनंद व्यक्त केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा