अमेरिकन तपास संस्था एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे. समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्ट मध्ये पटेल यांनी त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अॅटर्नी जनरल बोंबी यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या सिनेटने काल रात्री पटेल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. न्यायव्यवस्थेचं राजकीयीकरण थांबवून जनतेचा एफबीआय वरचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. काश पटेल हे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत. ते १० वर्षे एफबीआयचे संचालक राहतील.
Site Admin | February 21, 2025 1:26 PM | KASH
अमेरिकेत एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती
