आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील, असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या राजुरी इथं आयोजित केलेल्या ‘डाळिंब बहार मेळावा’ आणि ‘कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच सेंद्रीय शेतीलाही आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल, असंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | February 8, 2025 7:36 PM
शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
