शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान आणि भरडधान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत कुणी खरेदी करत असेल तर हा कक्ष त्यावर नियंत्रण ठेवेल. त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आणि किमान आधारभूत किमतीत धान्य खरेदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहील, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी या भरडधान्यांच्या खरेदीची मुख्य जबाबदारी मुख्य अभिकर्ता संस्थांवर असेल, खरेदी केलेलं भरडधान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवलं जाईल आदी आदेश देण्यात आले आहेत.
Site Admin | October 15, 2024 8:44 PM | farmers
शेतकऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय
