केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे. या वर्षभरात ही पाहणी होणार असून निवडक कुटुंबांनी गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक खर्चाबाबत माहिती संकलित करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश, शासकीय आणि खासगी दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधा इत्यादीची माहिती गोळा करणं हा आहे. नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील.
सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना सर्व संबंधित कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयानं केलं आहे.