डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 7, 2024 8:03 PM | India | US

printer

भारत-अमेरिकेची भागीदारी विशेष असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिकेची भागीदारी बहुआयामी आणि विशेष असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला असून, भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत उत्सुक आहे, असं सांगितल्याचं ते यावेळी म्हणाले.  भारत आणि अमेरिका लोकांच्या कल्याणासाठी तसंच  शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करतील असं जैस्वाल म्हणाले. 

 

कॅनडा मधल्या हिंदू मंदिरावरच्या हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले की, भारतानं या हल्ल्याचा निषेध केला असून, कॅनडा सरकारला कायद्याचं राज्य सुस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे.

 

भारतानं अफगाणिस्तानला मानवतावादी सहाय्या अंतर्गत, 50 हजार मेट्रिक टन गहू, 300 टन औषधं  आणि 28 टन भूकंप मदत सामग्री पुरवल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा