परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज कुवेतमध्ये दाखल झाले. कुवेतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांनी त्यांचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान, जयशंकर कुवेतच्या राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात उभय देशातल्या राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, संस्कृती तसंच दूतावास आणि लोकसंपर्क यासह द्वीपक्षीय संबधांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला जाईल. मध्यपूर्व आणि दक्षिण आशियातल्या भूराजकीय परिस्थितीसह उभय देशाच्या हिताच्या मुद्द्यांवरही या दौऱ्यात वैचारिक आदानप्रदान होणार आहे.
Site Admin | August 18, 2024 12:59 PM | External Affairs Minister S Jaishankar | Kuwait
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज कुवेतच्या दौऱ्यावर
