परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाह्यान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी संयुक्त अरब आमिरातीच्या नेत्यांचं समाजमाध्यमांवरून स्वागत केलं आहे. या भेटीमुळे उभय देशांमधली भागिदारी आणखी बळकट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. भारत आणि संयुक्त अरब आमिरात यांच्यात अनेक शतकांपासून व्यापार होत असून, 2022-23 या वर्षात भारतात थेट परकीय गुंतवणूक करणारा संयुक्त अरब आमिरात हा चौथा देश असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं म्हटलं आहे. भारतात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एकंदर 75 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमिरातीनं दिली आहे.
Site Admin | December 12, 2024 10:35 AM | UAE | परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर