तिसऱ्या ग्लोबल साऊथ परिषदेत, अन्न, आरोग्य, उर्जा सुरक्षा यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीचा काल समारोप झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याविषयी गरज असल्याचं सांगून सदस्यांमध्ये तशी भावना वाढत असल्याचं सांगितलं. या बैठकीत इतरही विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये संसाधनांविषयीची आव्हाने, संसाधनांपर्यंत पोचणे आणि रोजगार आणि आर्थिक असमानता या समस्यांचा समावेश होता. अनेक नेत्यांकडून हे मुद्दे मांडण्यात आले असल्याचं जयशंकर म्हणाले. तसंच अनेक नेत्यांकडून अत्यंत प्रतिकूल हवामान, कार्बन उत्सर्जन विषयक आव्हानं आणि कर्जाचा बोजा हे मुद्देदेखील उपस्थित करण्यात आले.
Site Admin | August 18, 2024 11:17 AM | Dr Jaishankar | Global South Summit
संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याविषयी गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री, डॉ. एस जयशंकर यांचा पुनरुच्चार
