परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच स्पेन दौरा आहे. या भेटीदरम्यान ते स्पेनचे परराष्ट्रमंत्री मॅन्युएल अल्बरेस यांच्या बरोबर द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक तसंच दोनही देशांसाठी महत्वाच्या जागतिक मुद्यांवर चर्चा करतील. ते स्पॅनिश राजदूतांच्या ९ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशी संवाद साधतील.