डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे इतर रोजगारसंधींना गवसणी घाला- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल मुंबईत केल. राज्यातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, नागपूरातून दूरस्थ प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदि उपस्थित होते.

 

भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये मोठं योगदान आहे. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण गरजेचे आहे, असं धनखड म्हणाले. डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यादृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1904 ते 1907 या काळात शिक्षण झाले त्याठिकाणी आपण उभे आहोत याचा अभिमान वाटतो, अशी भावना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा