डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. नागपूर इथं राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि  गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या मागील सरकारच्या कार्यकाळातील मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांच्यासह तेरा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, यांना यावेळी संधी मिळाली आहे. तर नितेश राणे, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.   

 

सर्वप्रथम भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशीष शेलार, शिवेंद्रसिंह भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

 

शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली.

 

राज्यमंत्री म्हणून भाजपाच्या माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे आशीष जयस्वाल, योगेश कदम, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा