डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातल्या विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाच्या सहा दरवाजातून तीन हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून, नदीपात्रात एक हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.  लातूर-धाराशिव सीमेवर माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे आठ दरवाजे काल बंद करण्यात आले, सध्या सहा दरवाजातून दोन हजार २९० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 8 हजार 123 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे आता दीड फुटाने उघडून, सुमारे २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा