आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
Site Admin | January 24, 2025 7:52 PM | EWS certificate