डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी केली जाणारी मतदान संयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया आज मुंबई आणि बीड शहरात पार पडली. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या  ३६ विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. 

 

बीडमधेही जिल्ह्यातल्या सर्व ६ विधानसभा मतदार संघातल्या मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ आज जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

 

सरमिसळ करण्यात आलेल्या या संयंत्रांची विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

 

सरमिसळ प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे जिल्हानिहाय विधानसभा मतदारसंघांची निवड करण्यात येते. दोन टप्प्यात करण्यात येते. प्रत्येक संयंत्राला विशिष्ट क्रमांक दिला जातो. सरमिसळ प्रक्रियेनंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी कोणतं  संयंत्र वितरीत करण्यात येणार आहे, याची यादी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तयार केली जाते. आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनं यादीचं प्रमाणीकरण केलं जात. या प्रक्रियेमुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपल्या विधानसभा क्षेत्रात वितरीत करण्यात येणारी संयंत्रच प्रत्यक्षात वितरित झाल्याची  खातरजमा करणं शक्य होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा