मृत्यूनंतर केलेलं अवयवदान हे अनेकांसाठी जीवदान ठरू शकतं, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या अवयवदान जनजागृती सोहळ्यात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यातल्या १६ हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा एक विक्रम असल्याचं जाधव म्हणाले. या सोहळ्यात उपस्थितांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली. तसंच अवयवदानाचा संकल्प घेतलेल्यांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
Site Admin | September 10, 2024 12:55 PM | organs donate | Prataprao Jadhav