विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा अशी आपली इच्छा आहे, सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी होणं गरजेचं असून ते एका अर्थानं सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचंच एक रूप आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं. आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांच्या पॉडकास्टसाठी प्रधानमंत्र्यांनी ही मुलाखत दिली. एक माणूस म्हणून माझ्याकडून चुका होऊ शकतात, पण मी वाईट हेतूने कधीही चुका करणार नाही, असंही मोदी यांनी या मुलाखतीत नमूद केलं.
राजकारणात यशस्वी होण्यासाठी समर्पण, बांधिलकी, संघभावनेनं काम करणं आणि स्वत: लोकांसाठी कायम उपलब्ध असणं हे गुण आवश्यक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केला. चांगल्या लोकांनी कायम राजकारणात येत राहिलं पाहिजे, आणि केवळ महत्त्वाकांक्षा न ठेवता ते मिशन मजून काम केलं पाहिजे, असं आपलं मत असल्याचंही,मोदींनी सांगितलं.