मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसंच निवडणुक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ एस. एस. संधू यांनी आज रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही,असं निवडणुक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबधितांच्या बैठका घेतल्या. निवडणुका प्रलोभनमुक्त व्हाव्यात, याची काळजी घेण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना दिले असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी बातमीदारांना सांगितलं.
निवडणुकी दरम्यान, तपासणीच्या नावाखाली लोकांना उगाच त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश आयोगानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड आणि बिहारलगतच्या सीमांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत.