देशात ऊस पिकाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारावा असं आवाहन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येत्या काही वर्षांत इथेनॉलची गरज वर्षाकाठी १ हजार कोटी लीटर इतकी भासणार असून हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. सरकारने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भविष्यात इथेनॉल इंधनाच्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढवण्याची तयारी केली पाहिजे, असंही शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | August 10, 2024 7:00 PM | Amit Shah | Ethanol Exports