भारतीय भाषांचा प्रभाव लोकमानसात कायम राहावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातल्या मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि अवेस्ता पहलवी अशा २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगाने ठराव करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक लेखन आणि अनुवादाला प्रोत्साहन दिलं जाणार असून त्याचबरोबर इतर भाषेतील शैक्षणिक साहित्य प्रादेशिक भाषेत भाषांतरित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.
Site Admin | December 9, 2024 7:27 PM | marathi bhasha | mumbai university