इस्रायल आणि हिजबोला या देशांमधला संघर्ष तीव्र होत असताना, इस्रायल-लेबनॉन सीमेवरील तणावही वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे जीवितहानी वाढत असून अनेक नागरिक विस्थापित होत आहेत. यामुळे वाढत्या हिंसाचाराच्या वाढत्या प्रभावाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या लष्करानं हिजबोलाविरोधातल्या लष्करी कारवाईची तीव्रता वाढली आहे.
इस्रायलनं काल 25 शहरं आणि गावांसाठी विस्थापित होण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे लेबनॉनमधल्या प्रभावित क्षेत्रांची संख्या 98 झाली आहे. इस्रायल लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत लष्करानं रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळं, बोगदे, लष्करी इमारती आणि लढाऊ उपकरणं शोधून नष्ट केली आहे तसंच लष्कराच्या काही तुकड्या हिजबोलाच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर लक्ष्य केंद्रीत करुन जमिनीवर आक्रमण करत आहेत.
तर हवाई दलानं हिजबोलाच्या लक्ष्यावर दीडशेहून अधिक हल्ले केले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या हल्ल्यात 23 नागरिक मरण पावले तर 93 जखमी झाले आहेत.