कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना बहुतांश दावे ३ दिवसात निकाली काढत आहे. शिक्षण, आजार, विवाह तसंच घर खरेदीकरिता मागितलेल्या १ लाख रुपयांपर्यंतच्या हंगामी कर्जांचं वितरण करण्यासाठी नवीन स्वयं चलित प्रणाली सुरू केल्याची माहिती संघटनेनं दिली आहे. या माध्यमातून २५ लाख प्रकरणं मार्गी लागली आहेत. आजारपणासाठी घेतलेल्या कर्जांचे अर्ध्याहून अधिक अर्ज निकाली काढल्याचंही संघटनेनं कळवलं. केंद्रीय कामगार सचिव सुमिता दावरा यांनी आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेतली.
Site Admin | June 14, 2024 8:24 PM | EPFO
EPFO बहुतांश दावे ३ दिवसात निकाली काढणार
