कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्य संख्येत यंदाच्या जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे २० लाख सदस्यांची वाढ झाली आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २ पूर्णांक ४३ टक्के इतकी आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या वर्षीच्या जून महीन्यामध्ये १० लाख ५२ हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली असल्याचं दिसून आलं. १८ ते २५ वयोगटामध्ये ९ लाख इतकी सर्वाधिक वाढ दिसून आली. तर जुलैमध्ये तीन लाखांहून अधिक नवीन महिला सदस्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये सहभाग नोंदवला आहे. या एकूण वाढीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा आणि गुजरात या राज्यांचा वाटा सुमारे ६० टक्के असल्याचंही आकडेवारीवरून दिसून येत आहे.
Site Admin | September 24, 2024 10:07 AM | EPFO