कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १८ लाख ५३ हजार निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत अशी माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. या महिनाभराच्या काळात सुमारे नऊ लाख ३० हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. एकूण नव्या सदस्यांपैकी अडीच लाखापेक्षा जास्त सदस्य महिला आहेत असंही मंत्रालयानं कळवलं आहे. रोजगाराच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी वाढलेली जागरूकता आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रचार प्रसाराच्या यशस्वी उपक्रमांमुळे ही सदस्यसंख्या वाढली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. ही आकडेवारी म्हणजे रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याचेच संकेत आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | October 20, 2024 6:24 PM | EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी