बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखीपौर्णिमा हा सण. या सणानिमित्त यंदा पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या टेटवाली, वाकी, जांभा, विळशेत, नडगेपाडा, वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून 35 हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत.
या पर्यावरणपूरक राख्या आसाम, पश्चिम बंगाल, गोहाटी, अरुणाचल प्रदेशमधल्या भारतीय नौदल सैनिकांना तसंच सीमेवरच्या सैनिकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या राख्या सीडपेपर मध्ये देण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे वृक्ष लागवड देखील होणार आहे.